१५ ऑक्टोंबर पासून राज्यातंर्गत रेल्वे धावू शकते..?

0 48

मुंबई- अनलॉक ५ मध्ये टप्प्या टप्यात राज्य सरकारने राज्यातंर्गत रेल्वे वाहतुकीला हिरवा सिग्नल दिला आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने राज्यातील रेल्वे वाहतूक सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावानुसार मध्य रेल्वेच्या मार्गावर १९ गाड्यांच्या फेर्‍या येत्या १५ ऑक्टोबरपासून धावण्याची शक्यता आहे. प्रवाशांची मागणी असलेल्या मार्गावर स्पेशल ट्रेन चालविण्यासाठी रेल्वे अभ्यास करीत आहे. याशिवाय लोकलच्या फेर्‍यादेखील वाढविण्यात येणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

रेल्वे प्रशासनाने तयार केलेला प्रस्ताव रेल्वे मंत्रालय आणि केंद्रीय गृह विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे त्यास परवानगी मिळाली की राज्यातील रेल्वे धावण्याचा मार्ग मोकळा होणार .

महाराष्ट्रातून दुसर्‍या राज्यात जाणार्‍या ज्या मार्गांवर प्रवाशांची जास्त वर्दळ आहे, त्या मार्गावर स्पेशल ट्रेन चालविण्याचा विचार रेल्वे करीत आहे. यामध्ये पंजाब मेलचा सुद्धा समावेश असणार आहे.

दिवाळी आणि छटपुजेकरिता देखील गोरखपूर, हावडा, लखनऊ आणि मडगावकरिता स्पेशल ट्रेन चालविण्याचे नियोजन रेल्वे करीत आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने देखील २१ गाड्यांचा ४२ फेर्‍या चालविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे.

Related Posts
1 of 1,359

या प्रस्तावानुसार मुंबई-पुणे डेक्कन क्वीन, मुबंई-पुणे प्रगती, इंटरसिटी, सिंहगड एक्सप्रेस, मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस, मुंबई-विदर्भ एक्सप्रेस, दादर-साई नगर शिर्डी एक्सप्रेस अशा विविध मार्गावरील १९ गाड्यांच्या फेर्‍या चालविण्यात येणार आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: