११ राज्यांमधील ५६ विधानसभा पोटनिवडणूक जाहीर

0 159

नवी दिल्ली- देशातील ११ राज्यांमधील ५६ विधानसभा मतदारसंघांत ३ आणि ७ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुका होणार असल्याची माहिती निवडणुक आयोगाने दिली आहे. आणि या सर्व ५६ विधानसभा निवडणुकीचा निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे.

या राज्यात होणार पोट निवडणुक-
मध्य प्रदेश (२८), उत्तर प्रदेश (७), छत्तीसगढ (१), गुजरात (८), हरियाणा (१), झारखंड (२), कर्नाटक (२), नागालँड (२), ओडिशा (२), तेलंगणा (१) या १० राज्यांतील ५४ विधानसभा जागांवर ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुका होतील. बिहारमध्ये एक लोकसभा मतदारसंघ तर, मणिपूरमधील दोन विधानसभा मतदारसंघांत ७ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होईल. आसाम, पश्चिम बंगाल, केरळ आणि तमिळनाडू या चार राज्यांमधील पोटनिवडणुकांच्या तारखा संबंधित मुख्य सचिवांकडून अहवाल आल्यानंतर जाहीर केल्या जातील.

Related Posts
1 of 2,047

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: