१०० बरोबर ११२ पण मदतीला


अहमदनगर- राज्यात १०० नंबर प्रमाणे आता सर्वसामान्य च्या मदतीला ११२ नंबर सुद्धा पोलीसने उपलब्ध करून दिले आहे.
या नंबर वर संपर्क करून सर्वसामान्यला तत्काळ आणी जलद मदत मिळणार आहे या साठी आवश्यक असणारे वाहन हे जिल्हा पोलीस दलात दाखल झाले आहेत.
पहिल्या ट्प्यातील एकूण सात वाहन दाखल झाले या सात वाहनाचा पुजन पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार आणि अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हे सेवा येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे.