हैदराबाद संघामध्ये भुवनेश्‍वर कुमारच्या जागी मिळू शकते या तीन खेळाडूंना जागा…

0 38

हैदराबाद- सनरायझर्स हैदराबाद संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर कुमार हे संपूर्ण आयपीएलमधून बाहेर झाला आहे. झटका सनरायझर्स हैदराबादला खूप मोठ्या प्रमाणात येणाऱ्या सामन्यांमध्ये जाणवणार आहे.

भुवनेश्‍वर कुमारला चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यादरम्यान हिप इंज्यूरी झाली. त्यामुळे तो त्या सामन्यात आपले षटक देखील पूर्ण करू शकला नव्हता आणि आता तो संपूर्ण हंगामातूनच बाहेर पडला आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघाने आत्तापर्यंत ५ सामने खेळले असून यामध्ये त्यांना २ सामन्यात विजय आणि ३ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. संघ ४ गुणांसह सातव्या स्थानी आहे. आता भुवनेश्वर कुमार आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर संघामध्ये एका उत्तम गोलंदाजांची कमतरता जाणवेल.
त्यामुळे आता संघ व्यवस्थापक भुवनेश्‍वर कुमार जागी कोणाला संधी देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भुवनेश्‍वर कुमारची जागा घेण्यासाठी तीन नाव सध्या चर्चेत आहे.

Related Posts
1 of 49

त्या मध्ये पहिला नाव म्हणजे युसुफ पठाण होय-
युसुफ पठाण मागच्या दोन वर्षे सनरायझर्स हैदराबादकडून खेळला आहे. मात्र यंदाच्या आयपीएलसाठी त्याला कोणीही खरेदीदार मिळू शकला नाही. मआता हैदराबाद संघात भुवनेश्वर ऐवजी युसुफ पठाणसारख्या अनुभवी खेळाडूचा समावेश होऊ शकेल जो शेवटच्या षटकांत स्फोटक फलंदाजी करू शकेल.
दूसरा नाव म्हणजे विनय कुमार
सनरायझर्स हैदराबाद संघ भुवनेश्वर कुमारच्या जागी सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज विनय कुमार याची देखील निवड करू शकतात. हा दिग्गज वेगवान गोलंदाज आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, कोची टस्कर्स केरळ, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स या संघाकडून खेळला आहे.
तर तिसरा नाव म्हणजे रोहन कदम होय-
सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२० मध्ये आतापर्यंत युवा खेळाडूंना बरीच संधी दिली आहे. त्यांनी मध्यक्रमात अब्दुल समद, प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मा असे युवा खेळाडू खेळताना दिसले. तर आता हैदराबाद संघ भुवनेश्वर ऐवजी रोहन कदम या एका युवा खेळाडूला संघात सामील करून घेऊ शकतो.
या पैकी कोणाची वर्णी लागते हे यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: