DNA मराठी

हिवाळ्यात कोरोना वाढण्याची शक्यता

4 101

मुंबई-येत्या काही महिन्यात भारतासह अनेक देशामध्ये कोरोनाचे प्रसार आणखी दुप्पट वेगाने होईल तसेच मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे असा इशारा
जागतिक आरोग्य संघटना (WHO) याने दिला आहे.
या हिवाळ्यात तरुण वर्गाला कोरोनाचा प्रसार होण्याची जास्त शक्यता आहे, असे प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक हेनरी क्लग यांनी केले आहे.

Related Posts
1 of 2,492


पावसाळा प्रमाणे हिवाळ्यातील वातावरण सुद्धा हे कोरोना प्रसार साठी अनुकूल आहे या मुळे येत्या काही महिन्यात भारतासह अनेक देशा मध्ये कोरोनाचा प्रसार तसेच मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या मुळे प्रत्येक देशाने आपआपल्या पातळीवर योग्य ते पाऊल उचलावे तसेच तपासणीचा वेग वाढवा असे सुद्धा हेनरी क्लाग याने सांगितले आहे.


तसचे कोरोनावरील लस आतापर्यंत मिळाली नाही या मुळे सुद्धा हिवाळ्यात कोरोनाचे वेग दुप्पट होऊन त्याचा खूप भयानक स्वरूप बनू शकते या मुळे प्रत्येक देशाने आपल्या पातळी वर योग्य ती काळजी घ्यावी असे मत (WHO) जागतिक आरोग्य संघटनेच्या संसर्गजन्य रोगांच्या तज्ञ मारिया केरखोव्ह यांनी सांगितले.


भारत सध्या अनलॉक ४ मध्ये जात अाहे केंद्र आणि राज्ये सरकारे अनेक निर्बंध काढून घेत आहे या मुळे नागरिकांनी सरकारचे नियमानुसारच राहावे तसेच सोशल डिस्टन्सचे पालन करावे.

Show Comments (4)
error: Content is protected !!
%d bloggers like this: