हा संघर्ष शेतकरी-कामगार विरोधी कायदे संपेपर्यंत सुरूच राहील – राहुल गांधी

0 25
 नवी दिल्ली –  सर्वोच्च न्यायालयाने काल सोमवारी केंद्र सरकारला झटका देत केंद्रसरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली. आणि शेतकऱ्यांबरोबर या प्रकरणात तोडगा काढण्यास केंद्र सरकार अपयशी झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाचा लवकरात लवकर तोडगकडण्यासाठी एक चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. यासमितीला आपला अहवाल ४ आठवड्यात साधार करण्याचा आदेश सुध्दा न्यायालयाने दिला आहे.
दरम्यान  काँग्रेस पक्षाने कृषी कायद्यावरून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी स्थापन केलेल्या चार सदस्यीय समितीबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. समितीमधील चारही सदस्य कृषी कायद्याच्या बाजूने असल्याने, या समितीकडून शेतकऱ्यांना न्याय नाही मिळू शकत, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.
 काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी ट्विट करत यासमितीमधील लोकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून प्रश्न विचारला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे कि  कृषीविरोधी कायद्यांचे लेखी समर्थन करणाऱ्यांकडून न्यायाची अपेक्षा कशी काय केली जाऊ शकते? हा संघर्ष शेतकरी-कामगार विरोधी कायदे संपेपर्यंत सुरूच राहील. जय जवान जय किसान.
Related Posts
1 of 1,321
तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले कि समितीमधील चारही सदस्यांनी या कायद्याचे समर्थन केलेले आहे. मग, जर समितीमधील चारही सदस्य अगोदरपासूनच पंतप्रधान मोदी व शेती विक्री करण्याच्या त्यांच्या षडयंत्रासोबत आहेत, तर मग अशी समिती शेतकऱ्यांबरोबर कसा न्याय करणार? सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जेव्हा केंद्र सरकारला फटकारले होते. तेव्हा शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी आशा निर्माण झाली होती. परंतु, ही समिती पाहिल्यावर आता अशी कुठलीही आशा दिसत नाही.
पुढे रणदीप सुरजेवाला म्हणाले कि आम्हाला माहिती नाही की सर्वोच्च न्यायालयाला या चारही जणांबाबत अगोदर सांगण्यात आले होते की नाही? शेतकरी या कायद्याल घेऊन सर्वोच्च न्यायालयात गेले नव्हते. या समितीमधील एक सदस्य भूपिंदर सिंह या कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गेले होते. मग खटला दाखल करणारा व्यक्तीच समितीचा सदस्य कसा असू शकतो? या चारही जणांच्या पार्श्वभूमीची तपासणी का केली गेली नाही? असा प्रश्न  सुध्दा त्यांनी  उपस्थित केला .
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: