‘हा’ मराठी चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले…जबरदस्त !

कोरोना महामारीमुळे बहुदा लोक घरात राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. मनोरंजनासाठी सिनेमा , टीव्ही पाहणे याकडे लोकांचा कल वाढला आहे.मात्र सध्या चित्रपटगृहांना बंदी असल्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्म हेच मनोरंजनाची थिअटर बनले आहेत. राज ठाकरे यांनीदेखील घरच्या घरी एक सिनेमा पहिला जो त्यांना प्रचंड आवडला आहे .राज ठाकरेंना आवडलेल्या मराठी चित्रपटाचे नाव आहे डॉ. काशिनाथ घाणेकर .
डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावरील हा सिनेमा आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर हे मराठी रंगभूमीवरील पहिले सुपरस्टार होते . काही दिवसांपूर्वी ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झालेला हा सिनेमा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बघितला. या सिनेमाचे कौतुक करताना राज ठाकरे म्हणाले की – अप्रतिम सिनेमा, कमालीची उत्तम बांधलेली स्क्रिप्ट, स्क्रिनप्ले आणि अर्थात दिग्दर्शन पण !
सिनेमा पाहताना जाणवत आहे सर्व पात्रे काय जबरदस्त आहेत.खरंच सगळ्यांचे अभिनय, कडक! दरम्यान डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमा २०१८ ला रिलीज झाला होता ज्याला भरभरून प्रतिसाद मिळाला होता .