‘हा’ पक्ष मोदी सरकार विरोधात करणार ‘चक्का जाम’ आंदोलन !

मराठा समाज , धनगर समाज आणि आता यानंतर शिरोमणी अकाली दल देखील सरकारविरोधी आंदोलन करणार आहे . मराठा आणि धनगर समाज आरक्षणासाठी आंदोलन करीत आहे .मात्र आता हा पक्ष मोदी सरकार विरोधात का आंदोलन करणार आहे जाणून घेऊया …
या आंदोलनाला कारणीभूत आहे कृषि विधेयक ! कृषि विधेयकाविरोधात शिरोमणी अकाली दल २५ सप्टेंबरला ‘चक्काजाम’ आंदोलन करणार आहे , माहितीनुसार हे आंदोलन पंजाब मध्ये करण्यात येणार आहे .फक्त आंदोलनच नाही तर शिखांच्या तीन धार्मिक तख्तांवरुन मोहाली पर्यंत किसान मोर्चा काढण्यात येणार आहे.विशेष म्हणजे शिरोमणी अकाली दल भाजपचा मित्र पक्ष आहे.
मागच्या आठवडयात कृषि विधेयक मुद्द्यावरून अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी राजीनामा देखील दिला आहे. अशी परिस्थिती असली तरीही शिरोमणी अकाली दल अजूनही भाजपासोबत आहे.२५ सप्टेंबरला सकाळी ११ ते २ या वेळेत चक्का जाम आंदोलन करण्यात येईल.