हाथरस प्रकरण : स्वरा भास्करसह काँग्रेस आणि भाजपा नेत्याला नोटीस !

0 39

हाथरस येथे घडलेलय सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली .या संतापजनक प्रकरणाचा निषेध करण्यासाठी देशभरातून आंदोलने केली गेली .या प्रकरणातील पीडितेचे फोटो आंदोलनांमध्ये वापरल्याची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे.

पीडितेचे फोटो वापरल्यामुळे अभिनेत्री स्वरा भास्कर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि अमित मालवीय याना नोटीस पाठवण्यात आली आहे.नोटीस मध्ये त्यांना यावर स्पष्टीकरण देखील मागवले आहे.

Related Posts
1 of 1,389

दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या आदेशनुसार, बलात्कार पीडित महिलेची कोणत्याही प्रकारे माध्यमांतून ओळख उघड होता कामा नये. मात्र, हाथरस पीडितेबाबत या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे ज्या लोकांना राष्ट्रीय महिला आयोगाने नोटिसा पाठवल्या त्यांना आपल्या सोशल मीडिया आकाऊंटवरुन पीडितेचे फोटो हटवण्यात यावेत आणि याचे स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी नोटीस द्वारे करण्यात आली आहे .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: