हाथरस घटनेचा निषेध : राष्ट्रवादीने अमित शहांना पाठवली ‘ही’ भेट !

0 15

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या घटनेचा निषेध देशभरातून केला जात आहे. पीडितेला न्याय मिळावा म्हणून लोक रस्त्यावर उतरले आहेत. आता या घटनेचा निषेध करत राष्ट्रवादीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना एक भेट पाठवली आहे.जळगाव राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून दोरखंडात जखडलेली प्रतिकात्मक संत मीराबाई यांची मूर्ती पाठवण्यात आली आहे.

तसेच देशातील महिलांची अशीच अवस्था झाली असून त्यांचे दोरखंड सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली गेली आहे.तसेच हाथरस घटनेबद्दल कल्पिता पाटील यांनी संताप व्यक्त करीत दोषींना तात्काळ कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे.नाहित्यर अन्यथा दिल्लीपर्यंत धडक मोर्चा आणण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

Related Posts
1 of 23

उत्तरप्रदेशातील हाथरस येथे दलित समाजातील एका तरुणीवर काही नराधमांनी अमानुषपणे सामूहिक बलात्कार केला आणि तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पीडित तरुणीचा मृत्यू झाला आहे .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: