हाथरस आणि बलरामपूर या सारख्या घटना महाराष्ट्रात सहन करून घेणार नाही – मुख्यमंत्री 

0 173

 मुंबई –  उत्तर प्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर या ठिकाणी महिलांवर बलात्कार होण्याच्या ज्या घटना घडल्या त्या दुर्दैवी आहेत. महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार काय कुणी वाकड्या नजरेनं पाहिलं तरीही सहन होणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मला म्हणायचे की दरारा आणि दहशत. पोलिसांचा असतो तो दरारा आणि गुंडांची असते ती दहशत. दहशत मोडून काढा, गुंडगिरी सुरु असेल तर ही दहशत मोडून काढली पाहिजे. या गुंडांसाठी पोलिसांचा दरारा पाहिजे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मिरा भाईंदर यांच्या हस्ते मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचा उद्घाटन सोहळा झाला. हा सोहळा ऑनलाइन पद्धतीने पार पडला त्यावेळी ते बोलत होते.

Related Posts
1 of 2,057

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या  १९ वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर देशभरातुन संताप व्यक्त केला जात आहे. दिल्लीमधील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु असतानाच तरुणीचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी अखेरचं एकदा मृतदेह पाहण्याची विनंती करुनही बळजबरीने अंत्यसंस्कार केले असा कुटुंबाचा आरोप आहे.

  ही घटना ताजी असतानाच बलरामपूर या ठिकाणीही एका युवतीवर बलात्कार झाल्याची आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.  यामुळे उत्तर प्रदेश सरकार वर चारी बाजूने टीका होत आहे. यातच उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता उत्तर प्रदेश सरकारवर हल्ला केला आहे  

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: