स्वस्थ जीवनशैलीसाठी 10 सुलभ टिप्स

0 29

लाईफस्टाईल चेंज करणाऱ्या काही हेल्दी टीप्स 

1. जेवणाची सुरूवात सॅलेडने करा
जेवण सुरू करताना भरपूर सॅलेड खा. ज्यामध्ये हिरव्या आणि पोषक पदार्थांचा समावेश करा

2. सुपरफूडचा आहारात समावेश करा

संध्याकाळच्या नास्त्यामध्ये फ्लैक्स सीड्स(आळशी), सनफ्लॉवर सीड्स(सुर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, सुकामेवा अशा प्रकारच्या सुपरफूडचा समावेश करा. शिवाय दररोज सकाळच्या नास्त्यामध्येही तुम्ही हे सुपरफूड्स घेऊ शकता.

3. प्रक्रिया केलेले आणि जंक फूड कमी प्रमाणात खा

आहारात प्रक्रिया केलेले पदार्थ, स्ट्रीट फूड, जंक फूड आणि तळलेले पदार्थ कमी प्रमाणात खा. शिवाय मद्यपान आणि धूम्रपानही कमी करण्याचा प्रयत्न करा.

4.आहारात गुड फॅटचा समावेश करा

आहारात गुड फॅडचं असणं फार गरजेचं आहे कारण गुड फॅट आपल्या शरीराच्या पोषणासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. यासाठी आहारात राईस ब्रान ऑईल, बदामाचे तेल, सुर्यफुलाचे तेल,ऑलिव्ह ऑईल, कॅनोला ऑईल, फ्लॅक्स सीड्स ऑईल, भोपळ्याच्या बिया, सुर्यफुलाच्या बिया, टरबुजाच्या बिया, फेटा चीज, अंडे, मध आणि मासे या पदार्थांचा समावेश करा. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा  कोणतीही गोष्ट अती प्रमाणात घेणं हे वाईटच. त्यामुळे तुमच्या आहारतज्ञांच्या सल्लानुसार या पदार्थांचे प्रमाण ठरवा.

5. हवाबंद कोड्रडिंक्स घेणे टाळा

कोल्डड्रिंक्स एखाद्या सौम्य विषाप्रमाणे शरीराचे नुकसान करतात. हळूहळू या पदार्थांचे दुष्परिणाम दिसू लागतात. मात्र तोपर्यंत वेळ हातातून निघून गेलेली असते. डाएट सोड्याचाही तुमच्या शरीरावर दुष्परिणामच होतो. तज्ञांच्या मते यामुळे तुमचे यकृत आणि किडनी खराब होण्याची शक्यता अधिक असते.

Related Posts
1 of 44

6. दररोज व्यायाम करा
फीट राहण्यासाठी तुमच्या वर्क आऊट इंन्स्ट्रक्टरचा सल्ला घ्या. पण  जर तुम्ही रोज व्यायाम करत नसाल तर सुरूवात 10 मिनीटे वॉक घेऊन करा आणि हळूहळू हे प्रमाण वाढवत जा. नियमित चालण्याचा व्यायाम केल्यामुळे तुमचे ह्रदय निरोगी राहण्यास मदत होईल. शिवाय लिफ्टचा वापर न करता जिन्याचा वापर करा. ज्यामुळे तुम्हाला एखाद्या दिवशी व्यायामासाठी वेळ काढता नाही आला तरी तुमचा सहज व्यायाम होऊ शकेल.

7. आवडीचा खेळ खेळा.
जर तुम्हाला तुमच्या शरीराला सुडौल शेप द्यायचा असेल तर आठवड्यातून कमीतकमी तीन दिवस तुमच्या आवडीचा खेळ खेळा. जर तुम्हाला खेळ खेळण्यात रस नसेल तर कोणतीही एखादी एक्टिव्हिटी जसे की स्केटींग,डान्स, स्विमिंग तुम्ही करू शकता.

8. आहारात साखर आणि मीठाचा कमी वापर करा
आहारातील साखर आणि मीठ यामुळे तुमचे वजन वाढू लागते. जर साखर आणि मीठ आहारात प्रमाणात घेतलं तर तुमचे वजन कमी होण्यास नक्कीच मदत होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटू लागेल.

9. ताण – तणावापासून  दूर रहा

सर्वात महत्त्वाचं म्हणजे निरोगी जीवनशैलीसाठी ताण-तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. यासाठी पुरेशी झोप घ्या. ज्यामुळे तुम्ही निवांत रहाल.

10. चेकलिस्ट तयार करा

जर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये आवश्यक बदल करायचे असतील तर एक चेकलिस्ट तयार करा आणि दर आठवड्याला ती चेक करा. जर तुम्ही तुमचं ईच्छित ध्येय गाठण्यास कंटाळा करत असाल तर या चेकलिस्टमुळे तुम्हाला चांगलच मोटीवेशन मिळू शकेल.

अशा छोटया छोट्या पण अगदी महत्वाच्या गोष्टींना फॉलो करून तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये योग्य बदल करू शकता.जीवनशैलीमधील हे बदल तुम्हाला निरोगी आयुष्य आणि तंदरुस्त शरीरप्रकृती देण्यास मदत करतील.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: