स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राला १७ पुरस्कार


मुंबई : दरवर्षी प्रमाणे यावर्षीही महाराष्ट्राला भारतात सर्वात जास्त पुरस्कार मिळाले आहेत. नवी दिल्लीमध्ये केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या उपस्थितीत ऑनलाईन सोहळ्यामध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला असून यावेळी लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे , कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे , नगर विकास विभागाच्या तत्कालीन प्रधान सचिव मनीषा म्हैसकर , प्रधान सचिव महेश पथक हेही उपस्थित होते . मोट्या राज्यांच्या मानांकनात महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळाला असून सलग तिसऱ्या वर्षी सर्वाधिक पुरस्कार मिळणार महाराष्ट्र एकमेव राज्य आहे . एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या श्रेणीत तिन्ही पुरस्कार महाराष्ट्रालाच , स्वच्छतेत नाविन्यपूर्ण कामासाठी अकोले शहराला पुरस्कार .