स्वच्छ शहर अभियानात जामखेड करांचा प्रतिसाद कमी – सुनंदाताई पवार

0 27

जामखेड – माझं शहर स्वच्छ सुंदर असावे ही संवेदना नागरिकांत होणे गरजेचे आहे यादृष्टीने आ. रोहीत पवार यांनी नदी खोलीकरण व सुशोभीकरण तसेच शहर स्वच्छ होईल यादृष्टीने प्रयत्न चालू आहेत परंतु येथील नागरिकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. अशी खंत श्रीमती सुनंदाताई पवार यांनी व्यक्त करून यापुढील काळात नागरिकांनी सहभाग नोंदवून स्वच्छता अभियान यशस्वी करावे असे आवहान सुनंदाताई पवार यांनी केले.

येथील रमेश गिरमे सभागृहात स्वच्छता अभियान संदर्भात सुनंदाताई पवार यांनी नागरीक, पदाधिकारी व अधिकारी यांची बैठक घेतली त्यावेळी सुनंदाताई पवार मार्गदर्शन करीत होत्या यावेळी बोलताना पवार म्हणाले  जामखेडपेक्षा कर्जतचा स्वच्छता सर्वेक्षणातील सहभाग उल्लेखनीय आहे. तेथे नागरीक श्रमदान करतात पवार कुटूंबानी यामध्ये झोकून दिले आहे. जामखेडमध्ये तसा प्रयत्न केला परंतु नागरीक स्वेच्छेने बाहेर पडत नाही माझं शहर स्वच्छ, सुंदर असावं, अशी जाणीव नागरिकांत व्हायला हवी, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्या सुनंदाताई पवार यांनी व्यक्त केली.

हे पण पाहा- बोठेच्या संपर्कातील त्या व्यक्तींची झाली सखोल चौकशी

पुढे बोलताना पवार म्हणाल्या, शासकीय कार्यालयांची पाहणी केली असता, सर्व इमारतींना एकच रंग असावा असा प्रस्ताव आला तसेच शहरातील भिंती “बोलक्‍या’ करण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून तीस लाखांचा रंग नगर पालिकेकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन अण्णांच्या भेटीला 

Related Posts
1 of 1,291

आपलं शहर स्वच्छ व सुंदर असाव ही मानसिकता प्रत्येक नागरिकांची असावी आणि त्या दिशेने पावलं उचलावीत विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांनी एकसंघ होऊन नियमित श्रमदानासाठी पुढे यावे.  एन.सी.सी. व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिशन म्हणून या कामात स्वतःला झोकून द्यावे. सर्वांनी एकजुटीने सातत्य ठेवून सहभाग नोंदविला तर निश्‍चितपणे आपले शहर स्वच्छ आणि सुंदर होईल. स्पर्धेत आपला पहिल्या पाच शहरांमध्ये समावेश होईल,” असा विश्वास सुनंदाताई पवार यांनी व्यक्त केला. आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून जामखेड शहराचे वैभव ठरलेली विंचरणा नदीचेे हरवलेलं रूप पूर्वपदावर यावं आणि ही नदी वाहती व्हावी याकरिता काम सुरू आहे हे काम अंतिम टप्प्यात आहे.

हे पण पाहा- पत्रकार बाळ बोठे यांच्या हनी ट्रॅप ची चौकशी करा:AD सुरेश लगड

सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना बसण्याकरिता ७० बाक, सार्वजनिक ठिकाणी कचरा वन्य साहित्य टाकण्यासाठी ६२ डजबिन तसेच अपंगाना तीन चाकी सायकल वाटप करण्यात आले.यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनिल बोराडे, महावितरण अभियंता विलास कासलीवाल, नागेश विद्यालयाचे मुख्याध्यापक नवनाथ ढवळे, मयुर भोसले आदी उपस्थित होते.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: