सोप्या पद्धतीने बनवा मकरसंक्रांतीला खुसखुशीत गुळाची पोळी

0 30

मकरसंक्रांत म्हटली की तीळ आणि गुळाचे वेगवेगळे पदार्थ आपोआपच डोळ्यासमोर यायला लागतात आणि मग त्याचे स्वादही आठवू लागतात. परंपरेनुसार घरात मकरसंक्रांतीला बनते ती गुळाची पोळी. आई ही गुळाची पोळी बनवायला लागली की आपोआपच त्याच्या खमंग वासाने पाय स्वयंपाकघराकडे वळतात आणि मनात एकदा तरी विचार येतोच की, ही गुळाची पोळी अशी खुसखुशीत आपल्याला बनवता येईल का? तर याचं उत्तर नक्कीच हो असं आहे. गुळाची पोळी बनवणं तसं तर किचकट काम आहे असं वाटतं. पण अगदी सोप्या पद्धतीनेही आपल्याला गुळाची पोळी नक्कीच बनवता येते. गुळाच्या पोळीसारखा खमंग आणि खुसखुशीत गोड पदार्थ नाही असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही. पांढरे तीळ आणि भाजलेल्या गुळाचा खरपूस वास, गरम पोळीवर सोडलेली तुपाची धार…आहाहा…सुटलं ना तोंडाला पाणी. अशीच ही तोंडाला पाणी आणणाऱ्या गुळाच्या पोळीची रेसिपी घ्या जाणून.

गुळाची पोळी संक्रांतीलाच का?

संक्रांतीच्या दरम्यान थंडी असते आणि गुळपोळी मध्ये वापरण्यात येणारे पांढरे तीळ, गूळ, शेंगदाणे हे सर्व पदार्थ शरीरामध्ये उष्णता निर्माण करणारे असतात. तसंच संक्रांत हा सण असतो आणि सणाला शरीरालाही फायदेशीर ठरणारा असा हा गुळपोळीचा नेवैद्य वर्षानुवर्षे दाखविण्यात येतो. वैज्ञानिक कारणामुळेच गुळाची पोळी संक्रांतीदरम्यान केली जाते. पुरणपोळी आपण करतोच. पण गुळाच्या पोळीची सर नक्कीच पुरणपोळीला येत नाही. कारण गुळाच्या पोळीचा खरपूसपणा हा अधिक चविष्ट लागतो आणि थंडीमध्ये गरमागरम गुळपोळी खाण्याची मजाच वेगळी आहे.

गुळाच्या पोळीची रेसिपी

गुळाची पोळी म्हटलं की बऱ्याच  जणांना वाटतं की खूपच फापटपसारा करावा लागणार. पण असं अजिबात नाही. साधारण एक तासामध्ये तुम्ही ही गुळाची पोळी करू शकता. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने कशी गुळाची पोळी करायची याबाबतील ही माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.

सारणासाठी लागणारे  साहित्य 

Related Posts
1 of 44
 • साधारण एक वाटी किसलेला गूळ
 • पाव वाटी बेसन (भाजलेले)
 • पाव वाटी कणीक
 • पांढरे तीळ
 • शेंगदाणे कूट
 • सुकं खोबरं भाजलेले (वाटायचं)
 • साजूक तूप
 • तेल
 • जायफळ पूड
 • वेलची पूड

पारीसाठी साहित्य

 • दीड वाटी कणीक
 • पाव वाटी मैदा

कशी करावी गुळपोळी 

 • कणीक आणि मैदा व्यवस्थित भिजवावे आणि दोन तास भिजवून ठेवावे
 • तीळ, शेंगदाण्याचे कूट आणि सुकं खोबरं हे वेगवेगळे कढईत भाजून घ्या
 • मिक्सरमधून एकत्र वाटा आणि पेस्ट तयार करा
 • बेसन भाजून घ्या
 • त्यानंतर किसलेला गूळ, भाजलेले बेसन हे वरील पेस्टमध्ये एकत्र मिक्स करा. नीट मिक्स झाले की वरून जायफळ पावडर आणि वेलची पावडर मिक्स करून घ्या. याचा एक मस्त सुगंध येतो
 • त्यानंतर भिजलेल्या पारीचे गोळे करून घ्या
 • हा गोळा पोळीसारखा लाटून त्यात सारण भरा आणि मग तव्यावर तूप अथवा तेल सोडून खरपूस भाजा
 • गुळाचा खरपूस खमंग सुगंध येऊ लागल्यानंतर याची एक बाजू परतून दुसरी बाजू भाजा
 • गुळाची पोळी तयार आहे.  गरमागरम पोळी तुपाची धार त्यावर सोडून खायला द्या
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: