सुष्मिता सेनने बॉलिवूड अभिनेत्रींच्या स्किन केअर रुटीनबाबत सांगितली मोठी गोष्ट, म्हणाली…

0 21

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन कोणत्याही मुद्यावर मनमोकळेपणाने चर्चा करते. एका मुलाखतीमध्ये तिने अभिनेत्रींच्या स्किन केअर रुटीनबाबत मोठी माहिती दिली. तिनं नेमके काय उत्तर दिलं होते? हे या लेखाद्वारे जाणून घेऊया…
सुष्मिता सेनने बॉलिवूड अभिनेत्रींच्या स्किन केअर रुटीनबाबत सांगितली मोठी गोष्ट, म्हणाली…
बॉलिवूडमधील सुंदर व हसतमुख अभिनेत्री सुष्मिता सेन वेगवेगळ्या मुद्यांवर अतिशय उघडपणे चर्चा करते. सध्या आपले काम आणि वयापेक्षा लहान असलेल्या प्रियकरासोबतच्या नात्यामुळे सोशल मीडियावर सुष्मिताची बरीच चर्चा पाहायला मिळते. यावर लोकांनी अगदी काहीही म्हटलं तरी सुष्मिता या नात्यामध्ये प्रचंड खूश आहे.

पण या लेखाद्वारे आपण सुष्मिता सेनच्या खासगी नात्यातील सौंदर्याबाबत नव्हे तर तिच्या दृष्टीकोनातून सौंदर्याची व्याख्या जाणून घेणार आहोत. याबाबत तिनं स्वत: एका मुलाखतीदरम्यान माहीत शेअर केली होती. जाणून घेऊया सविस्तर माहिती…

​‘आम्हा कलाकारांना असतात वाईट सवयी’
एका मुलाखतीदरम्यान सुष्मिता सेनला अभिनेत्रींच्या ब्युटी केअर रुटीनबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नाचं अतिशय स्पष्टपणे उत्तर देत तिनं म्हटलं की,‘सकाळी उठल्यानंतर चेहरा स्वच्छ धुण्याने दिवसाची सुरुवात होते. यानंतर पोअर्स क्लीनिंग, एक्सफोलिएशन यासारख्या गोष्टी कराव्या लागतात’.
पण जेव्हा आम्ही असे म्हणतो की, दररोज आम्ही आपल्या त्वचेसाठी अमुक करतो, तमुक करतो, सकाळी उठतो, टोनिंग- मॉइश्चराइझिंग करतो इत्यादी… त्यावेळेस आमच्यापैकी बहुतांश जण केवळ बोलण्याचेच काम करतात. काही अपवादात्मक परिस्थितींमध्ये असे घडतंही पण बहुतेक वेळा फक्त खोटंच बोललं जातं.
​सुष्मिताचा स्पष्टवक्तेपणा

Related Posts
1 of 61

सुष्मिताच्या स्पष्टवक्तेपणामुळे कोणीही अगदी सहज तिच्या प्रेमात पडेल. यामुळेच तिला फॉलो करणाऱ्यांची संख्याही भलीमोठी आहे. तिच्या मोहक अदा पाहून चाहतेमंडळी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. बॉलिवूड अभिनेत्रींच्या स्किन केअर रुटीनबाबत सुष्मिता सेननं हसत-हसत मोठी गोष्ट सांगितली.
मुलाखतीमध्ये तिनं म्हटलं की, ‘आमच्यापैकी कोणाचीही त्वचा अनुवांशिकरित्या सुंदर असेल, म्हणजेच कुटुंबातील अन्य सदस्यांचीही त्वचा सुंदर असेल तर आपली त्वचा सुद्धा शक्यतो सुंदरच असते… पण याबाबत आम्हाला प्रश्न विचारले गेले तर आम्ही बरेच काही सांगण्यास सुरुवात करतो. म्हणजे आम्ही त्वचेसाठी अमुक-तमुक गोष्टी करत असतो’.
​‘मी या वयात प्रचंड सुंदर दिसायचे’
मुलाखतीदरम्यान स्वतःच्या सौंदर्याबाबत सुष्मिता सेनने सांगितलं की, मला असं वाटतंय की मी वयाच्या अठराव्या वर्षापेक्षा ३८व्या वर्षी अधिक सुंदर दिसायचे. आयुष्यातील अनुभव आणि वेळ आपल्याला अधिक सुंदर बनवतात, असे माझे मत आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: