सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी सारा अली खानने केला मोठा खुलासा !

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी ड्रग्ज अँगल चा खुलासा झाला आणि हे प्रकरण नार्कोटिक्स विभागापर्यंत पोहचले. रिया चक्रवर्तीच्या तिने ड्रग्स प्रकरणात श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यासारख्या दिग्गज अभिनेत्रींच्या नावाचा खुलासा केला . या प्रकरणी दीपिका चे नावदेखील समोर आले आहे. नार्कोटिक्स विभागाने केलेल्या चौकशीत साराने सुद्धा धक्कादायक खुलासा केला.
सारा ने सांगितले की, आपण कधीच ड्रग्जचे सेवन केले नाही. चौकशीदरम्यान सारा काळजीत दिसत होती . सारा ने कबूल केले की ती २०१८ मध्ये केदारनाथ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुशांतबरोबर रिलेशनशिपमध्ये होती .तसेच चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर सुशांतच्या घरी त्याच्यासोबत राहायला गेली होती .
माहितीनुसार , NCB कडे सुशांत आणि तिच्याबद्दल माहिती देणारे काही हॉटेल मॅनेजरचे जबाब देखील आहेत. ते दोघे थायलंडला ट्रिपसाठी गेले होते. या पार्टीतदेखील ड्रग्ज घेतले गेल्याचा आरोप आहे. शूटिंग दरम्यान सुशांत ड्रग्स घ्यायचा याचा खुलासा साराने केला.