सुशांत सिंग मृत्यू प्रकरण : मुंबई पोलीस आयुक्तांचं जाहीर आव्हान !

0 37

सुशांत सिंग मृत्यू प्रकरणानंतर मुंबई पोलिसांवर अनेक आरोप करण्यात आले.यावर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी झालेल्या आरोपांवर प्रतिउत्तर दिले आहे. आम्ही अत्यंत योग्य पद्धतीने तपास केला होता असं त्यांनी स्पष्ट केले.तसेच काही जण मुंबई पोलिसांची बदनामी करत खोटी माहिती पसरवत होते अशी माहिती त्यांनी दिली.या प्रकरणी परमबीर सिंग यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना जाहीर आव्हानही दिले आहे.

परमबीर सिंग सांगितले की, कोर्टाने जेव्हा आमच्याकडे तपासातील प्रगती दाखवणारा रिपोर्ट मागितला तेव्हा आम्ही तो एका बंद लिफाफ्यात सादर केला होता.न्यायाधीशांनी हा रिपोर्ट पाहिला तेव्हा त्यांनी मुंबई पोलिसांच्या तपासात कोणतीही चूक दिसत नसल्याचं सांगितले .

Related Posts
1 of 1,406

आम्ही दिलेला रिपोर्ट कोणीही पाहिलेला नव्हता. अनेक मोठमोठ्या वकिलांनीही चॅनेलवर जाऊन आमच्या तपासावर टीका केली. त्या रिपोर्टमध्ये काय होतं हे चॅनेलने दाखवावं असं जाहीर आव्हान परमबीर सिंग यांनी दिलं आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: