सुशांत प्रकरणावरून राम कदम यांचा अनिल देशमुखांवर निशाणा !

0 20

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावरून तपास करताना पोलिसांच्या हाती ड्रग्स अँगल लागला आणि बॉलीवूड हादरले. या प्रकरणाचे पडसाद आता राजकारणातही पाहायला मिळत आहे.यावरून भाजप-शिवसेना या दोन पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत.ड्रग्स प्रकरणी आता भाजप आमदाराने शिवसेनेच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

भाजप आमदार राम कदम यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देखमुख यांच्यावर निशाणा साधत म्हटले आहे की-सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास वळवून ड्रग्स कनेक्शनवर आणला आणि त्यातही ड्रग्सबाबत मिळालेल्या दुव्याकडे मुंबई पोलिसांनी दुर्लक्ष का केलं? तसेच मुंबई पोलिसांना काही बड्या नेत्यांना वाचवायचं होतं का?असा खोचक सवालदेखील त्यांनी विचारला आहे.

Related Posts
1 of 253

बॉलिवूडमधील ड्रग्जचा वाढलेला व्यवसाय पाहता याची जबाबदारी सरकारने घ्यायला हवी. अशा गोष्टींची माहिती ही सरकारला असायला हवी. राम कदम यांनी ट्विटरवरून अनिल देशमुखांना टोला लगावला आहे.तसेच भाजपच्या आमदारानेही शिवसेना नेत्यांना हिंदू धर्माचा विसर पडला आहे असे म्हणत शिवसेनेला कोण वाचवण्याचा प्रयत्न करत आहे? असा सवाल केला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: