सुशांतसिंह राजपूतचा राजकारणासाठी वापर करणं भाजपला महागात पडणार- सचिन सावंत

0 42

मुंबई-  एम्सचा रिपोर्ट आल्यानंतर भाजपचं तोंड काळ होण्याची प्रक्रिया सुरु झाल्याची टीका कॉंग्रेसचे प्रवक्ता सचिन सावंत यांनी ट्विट करत भारतीय जनता पक्षा वर केलीय.
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा राजकारणासाठी वापर करणं भाजपला महागात पडणार असल्याचे ते म्हणाले. भाजपचा खरा चेहरा समोर आलाय.

गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पोलिसांना अतिशय वाईट पद्धतीने बदनाम केलं. महाराष्ट्राचा अपमान केला. गुप्तेश्वर पांडेना उगीचच सहज व्हीआरएस मिळाली नाही. पण महाराष्ट्रातील जनता भाजपला माफ करणार नाही असा टोल सचिन सावंत यांनी लावला.

तिन्ही एजन्सीना राजकीय षढयंत्र करुन महाराष्ट्रात आणलं गेलं. बिहार पोलिसांचा उपयोग राजकारणासाठी केला गेला. महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर आरोप करण्यात आल्याचे सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.

Related Posts
1 of 1,357

देवेंद्र फडणवीस बिहार भाजपाचे प्रभारी असताना जर मुंबई पोलीसांचा अपमान करुन महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंना भाजपाचा सहयोगी पक्ष तिकीट देत असेल तर ते अत्यंत दुःखद असेल असे सावंत म्हणाले. फडणवीसांनी याला निकराने विरोध केला नाही तर महाराष्ट्रात जनतेच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागेल असे सचिन सावंत म्हणाले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: