सुरेश रैनाच्या जागी हा इंग्लंडचा फलंदाज ? 

0 235

आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होण्याआधीच चेन्नई सुपरकिंग्ज संघाला अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने खासगी कारण देत संपूर्ण हंगामातून माघार घेतल्याने एक मोठा धक्का बसला आहे.रैनाच्या परिवारातील सदस्याला पंजाबमध्ये झालेल्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले. अशावेळी आपल्या परिवारासोबत असणं अधिक गरजेचं असल्याचं वाटल्यामुळे रैना भारतात परतला आहे. चेन्नई सुपरकिंग्ज (csk) ने आतापर्यंत रैनाच्या ऐवजी संघात बदली खेळाडूला जागा दिलेली नाही. रैना यंदाच्या हंगामात पुनरागमन करेल अशीही चर्चा सुरु आहे . परंतू आता csk संघ व्यवस्थापन इंग्लंडच्या ड्वाइड मलानला रैनाच्या जागी संघात स्थान देण्याच्या विचारात आहे अशी काही प्रसारमाध्यमांमधून बातमी समोर येत आहे.

Related Posts
1 of 84

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका पार पडल्यानंतर डेव्हिड मलानने आयसीसी टी-२० क्रमवारीत बाबर आझमला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला. ३ सामन्यांत मलानने १२९ धावा पटकावल्या. ज्यात पहिल्या सामन्यातील ६६ धावांच्या खेळीचाही समावेश आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पार पडलेल्या टी-२० मालिकेत मलानने इंग्लंडकडून चांगला खेळ केला आहे . csk चा संघ व्यवस्थापन मलानच्या खेळामुळे प्रभावित झालंय. सध्या फक्त चर्चा सुरु आहे,कोणतीही गोष्ट अंतिम झालेली नाही. मलान हा चांगला टी-२० खेळाडू आहे. रैनाप्रमाणे तो देखील डावखुरा फलंदाज आहे. परंतू आम्ही रैनाच्या बदल्यात कोणाला संधी द्यायची की नाही यावर आतापर्यंत काही निर्णय घेतलेला नाही. अशी माहिती काही प्रसार माध्यमांकडून येत आहे . परंतू चेन्नई सुपरकिंग्जचे सीईओ (ceo) काशी विश्वनाथन यांनी मलानला रैनाच्या जागी संधी देण्याबाबतचं वृत्त फेटाळलं आहे.एका वृत्तसंस्थेशी बोलत असताना विश्वनाथन यांनी चेन्नई सुपरकिंग्ज (csk) संघाचा परदेशी खेळाडूंचा कोटा पूर्ण झालेला असल्यामुळे कोणत्याही नवीन खेळाडूला संधी देणार नसल्याचं स्पष्ट केलं. चेन्नईच्या संघात सध्या ७ परदेशी खेळाडू आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: