सुनील तटकरे यांची चंद्रकांत पाटीलांवर टीका 

0 49

मुंबई – महाविकास आघाडी सरकार राज्यात अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे, हे सरकार निश्चित पणे पाच वर्षे स्थिर राहणार आहे हे  मी ठामपणाने सांगतो. तुम्ही  १०५ जागा मिळवूनही सत्तेपासून दूर राहिले या मुळे  तुमच्या नेत्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण होण मी समजू शकतो, परंतु चंद्रकांत पाटील तुम्ही सध्य  भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, मात्र अलीकडच्या कालावधीत चंद्रकांत दादांना काय झालंय असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडला आहे . 


 मात्र हे सरकार स्थिर आहे, हे सरकार पाच वर्षे स्थिर राहिल.मध्यवर्ती निवडणूकांची सुतराम शक्यता नाही, अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वतंत्र लढावं हे एकदमच मध्ये सुचण्याचं त्यांना कारण काय, आम्ही काय करावं हा निर्णय आमचे आणि देशाचे  नेते पवार साहेब ठरवतील तुम्ही या बाबत चिंता करू नका..

Related Posts
1 of 1,371

तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला स्वतंत्र निवडणुका लढवायच्या आहेत का? का कसं करायचं ते तुम्हाला ठरवायचं आहे, तुम्हाला आता कुठला मित्रपक्ष उरला नाही म्हणूनच तुम्ही अशा प्रकारची भाषा करत आहे . अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी स्थापन केलेल्या एनडीए मध्ये आता सुरवातीचे घटक पक्ष आज तुम्हाला सोडून एनडीतून बाहेर पडत आहे तुम्ही तिकडे लक्ष द्या असा टोला सुद्धा त्यांनी लावला आहे .   

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: