
आयपीएलच्या झालेल्या सामन्यात सुनील गावसकर यांनी विराटसाहित अनुष्कावर वादग्रस्त वक्तव्य केले. या प्रकारानंतर त्यांच्यावर प्रचंड रोष पाहायला मिळाला. दरम्यान गावस्कर यांनी आयपीएलच्या सामन्यात विराटची कामगिरी “ल़ॉकडाउन था तो सिर्फ अनुष्का के बोलिंग कि प्रॅक्टिस की इन्होंने” से वाक्य बोलले होते .त्यांच्या याच वाक्यावरून ते सध्या ट्रोल होत आहेत.
सोशल मीडियावर लोकांनी गावसकर यांच्यासारख्या महान फलंदाजाने अशा प्रकारे वक्तव्य करणं अपेक्षित नाही असे खडेबोल सुनावले आहेत . यावर आता अनुष्का शर्माने गावस्करांना देखील प्रतिउत्तर दिले आहे .
कालच्या सामन्यात विराटची कामगिरी बघून गावसकर यांनी “ल़ॉकडाउन था तो सिर्फ अनुष्का के बोलिंग कि प्रॅक्टिस की इन्होंने” असं म्हटलं. गावसकर यांनी उपरोधिकपणे टीका केल्याने अनुष्का शर्मा नाराज झाली असून तिने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अनुष्काने गावसकर यांना तुम्ही दिलेला संदेश अनादर करणारा आहे असे म्हटले आहे. पतीच्या कामगिरीसाठी पत्नीला जबाबदार का धरलं असावं? असा प्रश्नदेखील तिने उपस्थित केला आहे