सुजित झावरे यांना अटकपूर्वी जामीन मंजूर

पारनेर – विनयभंग, खंडणी मागणे, सरकारी कामात अडथळा या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने सुजित झावरे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला . माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्यावर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. झावरे यांच्या विरोधात तहसीलदार ज्योती देवरे यांनी फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते.
या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. कांदा निर्यातबंदी उठविण्याची मागणीचे निवेदन देण्यासाठी सुजित झावरे तहसील कार्यालयात गेले होते परंतु बराच वेळ झावरे कार्यालया बाहेर थांबावे लागले होते. तहसीलदारांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारावे अशी आंदोलकांची मागणी होती.
परंतु त्यांची बैठक सुरूच राहील्याने संतप्त झालेले झावरे तहसीलदारांच्या कार्यालत मध्ये घुसले .त्या मुळे त्यांच्यावर विनयभंग खंडनी मागणी आणि सरकारी कामात अडथळा आणणे या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता.