सीबीआय तपासावर देखील सुशांतचे कुटुंब नाराज !

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याचा CBI तपास करीत आहे. अगोदर या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते मात्र सुशांतच्या कुटुंबीयांनी त्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. मुंबई पोलिसांपाठोपाठ सीबीआयच्या तपासावरही सुशांतच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे .
सुशांत सिंह आत्महत्याचा तपास करताना अनेक धक्कादायक खुलासे झाले. त्यातून बॉलीवूड ड्रग्स अँगल चा खुलासादेखील झाला. ड्रग्स प्रकरणात अनेक बडे कलाकार जाळ्यात सापडत आहेत . सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास भरकटला असल्याचे मत व्यक्त करत त्याच्या कुटुंबीयांनी सीबीआय तपासावर नाराजी व्यक्त केली आहे असा दावा सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी केला आहे.
दरम्यान सुशांतने १४ जून रोजी राहत्या घरात गळफास घेतला होता.मुंबई पोलिसांच्या तपासात काही निष्पन्न झाले नाही म्हणून हा तपास CBIकडे सोपवण्यात आला होता .