सीबीआयचे माजी संचालक अश्वनी कुमार यांनी केली आत्महत्या

0 43

शिमला- सीबीआयचे माजी संचालक अश्वनी कुमार यांनी आत्महत्या केली आहे. त्यांचा मृतदेह शिमला येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे. शिमल्याचे पोलीस अधीक्षक मोहित चावला यांनी ही माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अश्वनी कुमार हे नैराश्याच्या गर्तेत होते. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि डॉक्टरांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधिकाऱ्यांसाठी ते एक आदर्श होते त्यांचा मृत्यू अशाप्रकारे होणं ही अत्यंत दुःखद घटना आहे अशी प्रतिक्रिया मोहित चावला यांनी दिली आहे.अश्वनी कुमार हे ऑगस्ट २००६ ते २००८ या कालावधीत हिमाचल प्रदेशचे डिजीपी होते. त्यानंतर त्यांना सीबीआयचे संचालक पद देण्यात आले.

ऑगस्ट २००८ ते २०१० पर्यंत ते या पदावर होते. त्यानंतर मणिपूरचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. जुलै २०१३ ते डिसेंबर २०१३ या कालावधीत ते या पदावर होते.अश्वनी कुमार हे अत्यंत शालीन आणि गंभीर स्वभावाचे होते. ते कमी बोलत असत मात्र त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असे. सीबीआयचे संचालक म्हणून काम करताना त्यांच्या कार्यकाळात अनेक हायप्रोफाइल केसेस त्यावेळी सीबीआयकडे आल्या होत्या.

Related Posts
1 of 1,357

आरुषी हत्याकांडाचा तपास जेव्हा त्यांच्याकडे सोपवण्यात आला होता तेव्हा नोकराविरोधात त्यांना चार्जशीट फाईल करु देण्यापासून रोखण्यात आले होते. आरुषी प्रकरण त्यांच्याकडून काढून घेत ते एका नव्या टीमला सुपूर्द करण्यात आलं होते .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: