DNA मराठी

सीएसकेच्या अडचणीत वाढ हे खेळाळूने घेतली माघार   

0 199

मुंबई – चेन्नई सुपरकिंग्ज(csk)चा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंह यंदाच्या आयपीएल(२०२०) मधून माघार घेतली आहे. खासगी कारण देऊन हरभजनने यंदाच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री हरभजनने चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाला आपण यंदाच्या हंगामात खेळू शकणार नसल्याचं कळवलं आहे. सुरुवातीला आईच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी हरभजन दोन आठवडे उशीरा युएईत दाखल होणार होता. १ सप्टेंबरपर्यंत हरभजन सिंह युएईत दाखल होणं अपेक्षित होतं. परंतू ती वेळ निघून गेल्यानंतर हरभजनने माघार घेण्याचं ठरवलंय असे समजत आहे.

Related Posts
1 of 110

चेन्नईचं संघ व्यवस्थापन लवकरच यासंदर्भातली अधिकृत औपचारिक घोषणा करणार आहे.  युएईत दाखल झालेल्या चेन्नईच्या संघासमोर गेल्या काही दिवसांमध्ये खूप अडचणी आल्या. सर्वात प्रथम दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाली. याचसोबत संघातील १२ सपोर्ट स्टाफचा करोना अहवालही पॉझिटीव्ह आला होता. यानंतर सर्व बाधित व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आलं. या सर्वांचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर चेन्नईचा संघ सरावाला आज सुरुवात करणार आहे.

याचसोबत संघाचा महत्वाचा खेळाडू सुरेश रैनानेही स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात CSK कोणत्या खेळाडूंना संघात स्थान देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. १९ सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: