सीईटी प्रवेश परीक्षा ऑक्टोबर – नोव्हेंबर मध्ये 

0 45

मुबंई – राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा परत एकदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १ ते १५ ऑक्टोबर दरम्यान पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा घेण्याचे आधी जाहीर केले गेले होते. तर दुसरीकडे अंतिम वर्षाच्या परीक्षा राज्यभरात १ ते २१ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार असल्याचे राज्यभरातील अकृषी विद्यापीठांनी ठरवलं आहे . त्यानंतर अंतिम वर्ष परीक्षेदरम्यान पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा येत असल्याने आता या पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यभरात अंतिम वर्ष परीक्षा देणारे विद्यार्थी त्याच दरम्यान होणाऱ्या सीईटी परीक्षा कशा देणार असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांसमोर होता. त्यामुळे सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांकडून सतत केली जात होती.

Related Posts
1 of 1,359

त्यामुळे विद्याथिची मागणी लक्ष्यात घेता अखेर या परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला आहे.म्हणून आता सीईटी प्रवेश परीक्षा या ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या, चौथ्या तर काही सीईटी प्रवेश परीक्षा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.  

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: