सीईटी परीक्षा ऑक्टोंबर महिन्यात

मुंबई- कोरोना मुळे पुढे ढकलण्यात आलेल्या उच्च व तंत्रशिक्षणाचे सामाईक प्रवेश परीक्षा सी ए टी हे येत्या १ ते १५ ऑक्टोबर दरम्यान होतील अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
ते म्हणाले की राज्य सामायिक प्रवेश परीक्षा १ ते १५ ऑक्टोबर दरम्यान होतील विद्यार्थीने आपले अभ्यास सुरू ठेवावा तसेच सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येतील असे त्यांनी म्हटले आहे.
याचबरोबर अंतिम वर्षाच्या परीक्षाच्या नियोजन करण्यासाठी त्यांनी राजभवनात जाऊन राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारीची भेट घेतली अंतिम वर्षाच्या परीक्षा सोप्या पद्धतीने घेण्यात यावे अशी मागणी त्यांच्या समोर केली आहे.त्यावर राज्यपालांनी सांगितले की कुलगुरू समितीचा अहवाल आल्यानंतर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या हितात असणारा निर्णय घ्यावा अशी सूचना त्यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना केली.
आज राज्याचे सर्व कुलगुरू सोबोत राज्याचे राज्यपालची बैठक होत आहे या बैठकीनंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन यांची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्या बैठकीमध्ये कुलगुरू समितीच्या अहवाल सादर होणार आहे. ते सादर झाल्यानंतर (यूजीसी) म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोग ला पत्र पाठवून अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात राज्याचे नियोजन काय आहे हे त्यांना कळविण्यात येतील.अशी माहिती पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी दिली.
तसेच दहावी आणि बारावी एटीकेटी परीक्षा ऑक्टोंबर मध्ये न होता नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होणार अशी माहिती शालेय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.