सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग

0 25

पुणे –  भारतात कोरोनापासून वाचवण्यासाठी निर्माण केली जाणारी लस बनवणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग लागली आहे. मांजरी परिसरातील गोपाळपट्टा भागात ही आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोव्हिशील्ड लस सुरुक्षित आहे.

ज्या इमारतीमध्ये लस निर्मितीचं काम सुरु आहे, त्या ठिकाणी ही आग लागलेली नाही. तर कोव्हिशील्ड लस बनवली जात असलेली जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला असलेल्या गेट आहे, तिथे ही आग लागली आहे. त्यामुळे कोव्हिशील्ड लसीला कोणताही धोका नसल्याची माहिती मिळत आहे.

कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग लागली आहे. दरम्यान लसीची निर्मिती ही सीरम इन्स्टिट्यूटच्या जुन्याच इमारतीत करण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशील्ड लसीच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती मिळत आहे.

Related Posts
1 of 1,301

मिळालेल्या माहितीनुसार ही आग मोठी आहे. सध्या अग्निशमन दलाच्या १० ते १५ गाड्या आग विझवण्याचं काम करत आहेत. या आगीत कुठलीही जीवितहानी झाल्याची प्राथमिक माहिती नाही.

तसंच सिरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशील्ड या लसीच्या निर्मिती आणि पुरवठ्यावर या आगीचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचं सुद्धा माहिती समोर आली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: