सावेडी नाट्य संकुलासाठी पाच कोटी रुपये विशेष अनुदान मंजूर- संग्राम जगताप

0 23
 अहमदनगर –  सावेडी नाट्य संकुलाचे काम गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होते. पूर्वी सन २०११ साली शासनाच्या वतीने सावेडी नाट्यगृहासाठी दोन कोटी रुपये इतके विशेष अनुदान मंजूर झाले होते. पण त्या नंतर सावेडी नाट्यगृहाच्या कामाची व्याप्ती व आसन क्षमता पाहता, सावेडी नाट्यगृहासाठी अंदाजे ११ कोटीच्या आसपास खर्च येणार होता.
महानगरपालिकेने शासनाच्या वतीने मिळणाऱ्या इतर अनुदानातून काही तरतूद केली होती. पण साधारणपणे नाट्यगृहाच्या कामासाठी अजून अंदाजे ७ ते ८ कोटी रुपये निधी कमी पडणार होता. त्या अनुषंगाने सावेडी नाट्यगृहासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादाजी पवार यांना उर्वरित निधी बाबत मागणी करण्यात आली होती.
Related Posts
1 of 1,291
त्या अनुषंगाने राज्यस्तरीय व विभागीय जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत मा.उपमुख्यमंत्र्यांनी सावेडी नाट्यगृहासाठी जिल्हा नियोजन मंडळाला पाच कोटी इतकी तरतूद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सावेडी नाट्यगृहाच्या कामासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून पाच कोटी रुपये इतका निधी उपलब्ध होणार आहे आणि लवकरच अद्यावत असे सावेडी नाट्यगृह नगरकरांसाठी उपलब्ध होईल.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: