DNA मराठी

सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक वार्षिक कर भरणाऱ्या वाहनांना दि.१ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत वाहन करमाफीचा निर्णय

0 73

मुंबई : कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या लॉकडाऊन मुळे सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक करणारे वार्षिक कर भरणाऱ्या वाहनांना दि. १.एप्रिल २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत वाहन करमाफी देणेबाबतचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आलाय अशी माहिती परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांनी दिली.  

Related Posts
1 of 2,489

कोविड -१९ पार्श्वभूमीवर केंद्रशासनाने दिनांक २५ मार्चपासून संपूर्ण देशात  लॉकडाऊनमुळे घोषित केले होते .  त्यानंतर राज्य शासनाने दि.३१ मे २०२० च्या आदेशान्वये मिशन बिगिन अगेन अंतर्गत काही प्रमाणात लॉकडाऊन खुले  केले आहे. या  लॉकडाऊन च्या कालावधीत सार्वजनिक वाहतूक बंद होती, त्यामुळे विविध वाहतूक संघटनांनी नुकसान भरपाई म्हणून शासनाने करमाफी द्यावी, अशी विनंती केली असता  यासंदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.राज्या मध्ये वार्षिक करप्रणालीच्या वाहनांचा दि. १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२० या सहा महिन्यांच्या कालावधीत कर भरण्यापासून १०० टक्के करमाफी देण्याचा म्हणजे सन २०२० -२१ या आर्थिक वर्षासाठी एकूण वार्षिक कराच्या ५० टक्के करमाफी देण्याचा निर्णय झालाय . सदर करमाफी ही मालवाहतूक करणारी वाहने, पर्यटक वाहने, खोदकाम करणारी वाहने, खाजगी सेवा वाहने, व्यावसायिक कॅम्पर्स वाहने, स्कूल बसेस या वार्षिक कर भरणाऱ्या वाहनांना लागू राहणार आहे.या सर्व कर भरणाऱ्या वाहनांची एकूण संख्या ११ लाख ४० हजार ६४१ एवढी आहे. त्यामुळे राज्य शासनास सुमारे ७०० कोटी एवढा कर कमी मिळणार असल्याने राज्य शासनावर तेवढा आर्थिक भार राहणार आहे, असेही श्री.परब यांनी सांगितले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: