‘सारथी ‘ सह मराठा समाजाच्या योजना आता अजित पवारांकडे

मुंबई- मराठा समाजाशी संबंधित सारथी तसेच मराठा समाज योजनांचा कारभार अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाकडे वर्ग करण्यात आला.
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था(सारथी) आणि मराठा समाज समृद्धी योजनेची जबाबदारी आतापर्यंत काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या बहुजन कल्याण विभागाकडे होती. मात्र वट्टेडीवार न्याय देत नसल्याचा आरोप केला जात होता.
आता सारथी सह मराठा समाजाच्या योजनांचा कारभार अखेर वित्त व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अखत्यारीत असलेल्या नियोजन विभागाकडे वर्ग केला आहे. राज्य सरकारने याबाबत शासन निर्णय जाहीर केला. वट्टेडीवार समाजास न्याय देत नसल्याचा आरोप केला जात होता या आरोपांनी व्यथित होऊन वट्टेडीवार यांनी ही जबाबदारी अजित पवारांनी स्वीकारावी अशी विनंती केली होती.