सातार्यात पत्रकारांसाठी उभारले गेले पहिले कोरोना सेंटर !

भारतात कोरोनाचा प्रचंड कहर पाहायला मिळत आहे. दरदिवशी जवळ जवळ ९० हजारांहून जास्त रुग्ण सापडत आहेत. अशा परिस्थीमध्येदेखील पत्रकार ,पोलीस , डॉक्टर आशा , अंगणवाडी सेविका आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांसाठी आपले काम करत आहेत. डॉक्टर ,पोलीस ,पत्रकारदेखील कोरोनाचे शिकारी होताना दिसत आहेत.
कोरोनाबाधित पत्रकारांना होम आयसोलेशनच्या अडचणी लक्षात घेऊन सातारा जिल्हा पत्रकार संघाने राज्यातील पहिले पत्रकार करोना सेंटर उभारले आहे. सातारामध्ये हे कोरोना सेंटर उभारण्यात आले आहे. यवतेश्वर परिसरातील हॉटेल निवांत येथे हे सेंटर पत्रकारांसाठी उभारण्यात आले आहे.
सातार्यातदेखील मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे .सातार्यात अनेक पत्रकारांना कोरोनाची बाधा झाली आहे. हे प्रमाण लक्षात घेता पत्रकारांसाठी कोरोना सेंटर उभारण्यात आले आहे.या सेंटरमध्ये पत्रकारांना एकदा प्रवेश दिल्यानंतर विलगीकरण कक्षातून १० दिवस बाहेर पडता येणार नाही.याठिकाणी आरोग्य यंत्रणेच्या मार्फतच संबंधित व्यक्तीची चाचणी आणि उपचार होणार आहेत.