DNA मराठी

सहा एकर वनजमिनीवरती जैवविविधता 

0 92

संदीप राठोड यांचा उपक्रम ; सामाजिक संस्थांचीही मदत पाथर्डी : आज वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असून वृक्ष लागवडीवरती भर देणे आवश्यक आहे ज्यामुळे प्रदूषणावरती आपण मात करू शकतो . खूप कमी वृक्षप्रेमी असे आहेत जे वृक्षारोपण करून त्यांचं संवर्धन करतात . असाच एका वृक्षप्रेमींनी सहा एकर जमिनीवर वनऔषधी अशा साडेतेराशे रोपांची लागवड केली आणि संवर्धनही केलं .

Related Posts
1 of 2,492

पाथर्डी, तीसगाव  येथील सदगुरुवाडीतील प्राथमिक शिक्षक संदीप राठोड यांनी २ वर्षात हा उपक्रम राबविला असून त्यांच्या या उपक्रमाला जिल्ह्यातील जिल्हा निसर्गप्रेमी संघटना , भारतीय जैन संघटना , बहूउद्देशीय सिद्धिविनायक प्रतिष्ठाणची मदत मिळते . या संस्था पाण्याचे टँकर , शेणखत या कामात मदत करते . मांडवे मोहोज रस्त्यावर “आनंदवन नामाभिधान ” असलेली हि बाग आहे .  निसर्गरम्य वातावरण, पक्षी , वृक्षवेलींनी भरलेला हा परिसर मोहिनी लावून जातो . या परिसराला बाहेरून काटेरी कुंपण घातले असून यामध्ये असलेल्या वनऔषधी  या अनेकविध कमी येत असतात . वैयक्तिक वाढदिवस , दशक्रिया , पुण्यस्मरण निमित्त वृक्षारोपण अशा कार्यक्रमांसाठी परिसरातील नागरिकांची पावले आनंदवन मध्ये वळतात . 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: