सहस्रकुंड या धबधब्यात ५ जणांची उडी मारून आत्महत्या हे होते कारण……..

0 150

इस्लापूर – दोन भावांतील मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाने पत्नी, दोन मुली आणि एका मुलासह सहस्रकुंड या धबधब्यात उडी घेतल्याची घटना काल घडली.

मालमत्तांच्या वादाला कंटाळून मोठा मुलगा प्रवीण यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. दोन दिवसांपूर्वी हदगाव येथून चारचाकी वाहन भाड्याने घेऊन कवानकर कुटुंब सहस्त्रकुंड येथे पोहचले होते. आमचा मेहुणा येत आहे, असे सांगून त्यांनी वाहन परत पाठविले होते. मुरली गावानजीक धबधब्यात काल पाचही जणांनी उड्या मारल्या. प्रवीण यांचा मृतदेह इस्लापूरनजीक तर मुलगा सिद्धेश आणि अश्विनी यांचा मृतदेह दराटी परिसरात आढळून आला.

Related Posts
1 of 2,057

यातील तिघांचे मृतदेह हाती लागले. दोन्ही मुलींचा शोध उशिरापर्यंत सुरूच होता. प्रवीण भगवानराव कवानकर (४२), त्यांच्या पत्नी अश्विनी (३८), मोठी मुलगी सेजल (२०), समीक्षा (१४) आणि लहान मुलगा सिद्धेश (१३) अशी मृतांची नावे आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: