सलमान खान आणि कटरीना कैफ परत येणार एकत्र

0 26

नवी मुंबई –  देशात कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे सर्वकाही बंद पडला होता. लोकांना एंटरटेनमेंट करणारे चित्रपटाची शूटिंग सुद्धा बंद पडली होती. मात्र आता हळूहळू सर्व काही सुरु होत आहे.

थेटर बंद असले तरीसुद्धा काही सिनेमे ओटीटी  प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यास सुरुवात झाली आहे.
यावर्षी वर्षी मोठे मोठे बॅनरचे चित्रपट रिलीज होणार होते मात्र कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. यामुळे बहुतेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरच रिलीज झाले आहे.

याच दरम्यान अभिनेता सलमान खान याच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे , सलमान खान आणि कतरिना कैफ लवकरच एक नवीन चित्रपटासाठी परत एकदा एकत्र येणार आहे.  यापूर्वी सलमान आणि कटरीना ने केलेला टायगर जिंदा है हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करणारा ठरला होता.

आता ही जोडी टायगर-३ या तिसर्‍या चित्रपटाची तयारी करत आहेत. या चित्रपटासाठी चाहते दीर्घ काळापासून प्रतीक्षा करत होते. चाहत्यांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे.

Related Posts
1 of 61

टायगर ३ हा सलमान खान आणि कतरिना कैफ या जोडीचा नववा चित्रपट असेल. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान आणि कतरिना मार्च २०२१ पासून ‘टायगर ३’ च्या शुटिंगला सुरुवात करणार आहेत. यासोबतच या चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचं चित्रीकरण मुंबईत होणार असल्याचेही सांगितलं जात आहे. तर यानंतरचं उर्वरित शूटिंग मध्य पूर्व (आखाती राष्ट्र) देशांत केलं जाणार आहे. एवढंच नाही तर या आगामी चित्रपटात तुम्हाला शाहरुख खान  देखील दिसणार आहे. चित्रपटातील एका खास सिनमध्ये शाहरुख खान दिसेल.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: