सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलच्या दरात वाढ

0 25

नवी दिल्ली – एकीकडे आज संपूर्ण देश आपला ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे तर दुसरीकडे सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहे.

आज पेट्रोल दरात दिल्लीमध्ये 35 पैशांनी वाढ झाली आहे.तर राज्याची राजधानी मुंबईमध्ये 34 पैशांनी पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे.

मंगळवारी दिल्लीत पेट्रोलचा दर 86.05 रुपये प्रति लीटर इतका असेल. तर मुंबईत 92.62 रुपये प्रति लीटर असेल. तर कोलकात्यात पेट्रोलचा दर 87.45 रुपये प्रति लीटर असेल. तर दिल्लीत डिझेलचा दर 76.23 रुपये प्रति लीटर असेल. तर मुंबईत 83.03 रुपये प्रति लीटरने डिझेल मिळणार आहे.

Related Posts
1 of 1,292

सध्या राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांकी गाठली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 90 च्या पार गेला आहे गेला आहे . तर डिझेलचे दर हे 80 रुपयांच्या पार गेले आहेत.

प्रक्रिया केल्यानंतर पेट्रोल पंपावर पेट्रोलचा मूळ दर हा 28.50 रुपये प्रति लीटर असते. तर डिझेलचा मूळ दर हा 29.52 रुपये प्रति लीटर असते. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या करांमुळे पेट्रोल-डिझेलचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. सरकार पेट्रोल आणि डिझेलवर त्याच्या मुळ किमतीच्या दुप्पटीपेक्षा जास्त कर आकारते

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: