सरणावर बसून हाथरस प्रकरणाचा निषेध

0 48

अहमदनगर – उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील मागासवर्गीय मुलगीवर सामुहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी निषेध नोंदविण्यासाठी बहुजन वंचित आघाडीच्या वतीने रेल्वे स्टेशन रोड वरील अमरधाम मध्ये सरणावर बसून आंदोलन करण्यात आले. उत्तरप्रदेश हाथरस या ठिकाणी दलित समाजाच्या १९ वर्षीय निर्भयावर अत्याचार करण्यात आला तरुणीवर मारहाण करुन सामुहिक बलात्कार करण्यात आला होता. तिने याची कुठेही वाच्यता करु नये म्हणुन तिची जीभ देखील नराधमांनी चाटली होती. उपचारा दरम्यान तिचा मृत्यु झाले आहे. या अमाननीय घटनेचा निषेध करण्यासाठी बहुजन वंचित आघाडीच्या वतीने रेल्वे स्टेशन रोड वरील अमरधाम मध्ये सरणावर बसून आंदोलन करण्यात आले.


उत्तरप्रदेशात वारंवार अशी घटना घडत आहे. उत्तरप्रदेश मध्ये दलित अत्याचाराच्या घटनां वाढत असून समाजासाठी धोकादायक आहेत, एकंदरीतच जातीय अत्याचाराच्या घटना घडविण्यासाठी जात्यांध धर्मार्थ वृत्तीच्या लोकांना रानमोकळे करून देणे आणि अशा घटना घटल्यानंतर सुध्दा त्या आरोपींना अटक न करणे या सोबतच या घटनेचा निषेध नोंदवतील त्यांच्यावर मात्र अटकेची कारवाई करणे अशा चुकीच्या पध्दतीचा राज्य कारभार योगी आदित्यानाथ यांच्या सरकार कडुन सुरु आहे. त्यामुळे हाथरस येथील जातीय हत्याकाडात बळी, या अमानवी हत्याकांडास जबाबदार असणा-या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याबाबतची कलमे नोंदवून त्वरीत फाशी द्यावी,हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे तसेच तेथील जिल्हाधिकायांचीही चौकशी करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने अहमदनगर जिल्हाधिकारी समोर केली आहे केली.

Related Posts
1 of 1,359


यावेळी जेष्ठ नेते सुरेश दुधगांवकर म्हणाले,उत्तरप्रदेश सरकारचा जाहीर निषेध करित असुन ह्या तरुणीवर जाणुनबुजुन जातीय द्वेषातुन अत्याचार करण्यात आला आहे. सर्व आरोपींना कडक शिक्षा करावी. महिला आघाडी जिल्हाध्यक्षा छाया सर्वदे,सरचिटणीस अरुण आठवले यांनीही निषेध नोंदवला. या आदोलनात डॉ.रविकुमार गवई, बापु सोनावणे, प्रभाकर नाईक, संतोष सरवदे, सुमन वाघमारे, नितेश वाघमारे, माणिक गस्ते, शिवाजी वाघमारे, मिलिंद कांबळे, जितेंद्र बनसोडे यांचेसह कार्यकर्ते सहभागी होते.
या आहेत मागण्या
१. पडलेल्या मनिषा वाल्मिकी या भगिनीला आदरांजली अर्पण करून पुढील मागण्या मान्य करावे. सदर खटल्याची सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमुर्ती मार्फत विशेष
चौकशी समिती गठित करण्यात येऊन ३० दिवसाच्या आत चार्जशीट तयार करण्यात यावे. २. सदर खटला उत्तरप्रदेश बाहेर मुंबई, चेन्नई , कोलकाता अथवा दिल्ली उच्च न्यायालयात चालविण्यात यावा, मनिषा वाल्मिकी हिचा अंतिम संस्काराच्या नावाखाली महत्वपुर्ण पुर्नतपासणीचे पुरावे नष्ट केल्या प्रकरणी जिल्हाधिकारी पोलीस अधिक्षक आणि त्यांना आदेशीत करणा-या मंत्र्यावर ३०२,१२० अन्वये गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर अटक्याची कारवाई करावी. ४. या घटनेतील फिर्यादी व त्यांचे कुंटुबीय व साक्षीदारांना संपुर्ण संरक्षण देण्यात यावे. वरील सर्व मागण्या मान्य न झाल्यास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे सुचनेने जिल्हयासह राज्य भारत तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असे या वेळ सांगण्यात आले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: