सरकारमान्य देशी दारुचे दुकान ड्राय डे असून देखिल सुरू

0 26

अकोले:शहरात देवठाण रोडवरील सदाफुले हॉस्पिटल समोरील सरकारमान्य देश दारुचे दुकान महात्मा गांधी व लालबहादूर शास्ञी जयंती, ड्राय डे असून देखिल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सुरु होते.

अकोलेतून उत्पादन शुल्क मंञी दिलिप वळसेपाटिल यांना फोन गेला अन् मंञ्यांच्या सुचनेवरुन राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाºयांनी शुक्रवारी सकाळी कारवाई केली.अधिकायांची कारवाई सुरु असताना देखील मद्यपी ग्राहक दुकानात घुसताना दिसत होते.प्रवरा कॉर्नर ते मॉडर्न हायस्कूल चौक दरम्यान असलेले दारु दुकान सुरु असल्याचे लक्षात येताच सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्य उत्पादन शुल्क अधिकायांना कळवले पण ते दात देत नसल्याने थेट उत्पादन शुल्क मंञ्यांना फोन वरुन माहिती दिली. निदान गांधी जयंतीच्या दिवशी तरी दारु दुकान बंद राहावे अशी मागणी करण्यात आली. कोरोना लॉकडाऊन काळात देखील सरकारी नियम धाब्यावर बसवून हे दुकान चालू असायचे. मागणी केली तरी कारवाई होत नव्हती.

उलटपक्षीअधिकायांकडून सामाजिक कार्यकर्त्यांना उद्धटपणाची वागणूक मिळत असे.मंञी वळसे पाटील यांनी वरिष्ठ अधिकाºयांची कानउघडणी केल्यानंतर शुक्रवारी उत्पादन शुल्कचे निरिक्षक रोहीदास वाजे, दुय्यम निरिक्षक पी.एन.कडभाने, ए.डी.यादव, कॉन्स्टेबल निमसे, शेख, पाटोळे यांच्या पथकाने जी.व्ही.आखाडे यांच्या सरकारमान्य दुकानावर कारवाई केली.विभागिय गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Related Posts
1 of 1,359

संबधित देशी दारुदुकान परवाना निलंबित करण्यासाठीचा अहवाल प्रांताधिकारी यांचेकडे सादर करु असे वाजे यांनी आमदार डॉ.किरण लहामटे व तहसिलदार मुकेश कांबळे यांना सांगितले. तसेच काही दिवसापूर्वी आमदार. डाॅ. किरण लहामटे यांनी अकोले तालुक्यातील अवैध्द धंदे तात्काळ बंद करावेत या मागणीसाठी मुख्यमंञी ,ग्रुहमंञी,पालकमंञी कलेक्टर यांना निवेदन दिले होते व २ आक्टोबर म्हणजेच गांधी जयंती च्या दिवशी ते आत्मक्लेश आंदोलन करनार होते, परंतु तहसीलदार, पोलिसनिरीक्षक व उत्पादन शुल्कच्या लेखीअश्वासनानंतर त्यांनी आत्मक्लेश चा निर्णय मागे घेतला आहे. तसेच अवैध दारु ,मटका,जुगार, गांजा, वाळू अदी धंदे करनार्यांवर तात्काळ कारवाया करा असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: