DNA मराठी

संभाजी बिडी नावाने धूम्रपान हा महाराजांचा अपमान : शिवधर्म फाउंडेशन 

0 84
Related Posts

e9cb22df0a045c8304dda55a57b82a32

e9cb22df0a045c8304dda55a57b82a32

1 of 30

अहमदनगर  : महाराष्ट्रात गेली 80 वर्षांपासून संभाजी बिडी नावाने धूम्रपान हा महाराजांचा अपमान, संभाजी बिडीचे नाव बदलण्याची मागणी, कारवाई नकेल्यास महाराष्ट्र आंदोलनाचा इशारा शिवधर्म फाउंडेशनने दिला. महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती संभाजी यांच्या नावाने महाराष्ट्रात गेली 80 वर्षांपासून संभाजी बिडी या नावाने धूम्रपान उत्पादन केले जातेय , महाराजजांची  युद्धनीती, लेखन, संपूर्ण जगाला माहिती आहे. असं असताना जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात त्यांच्या नावाने बिडी उत्पादन होतं आहे. या बिडीच्या बंडल वर महाराजांचे नावाने याची विक्री होते. तो कागद फाडून फेकला जातो. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान होतोय  हा अवमान सहन केला जाणार नाही. बिडी उत्पादन करणाऱ्या कंपनीने नाव बदलून निर्मिती करावे. अशी मागणी शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दिपकअण्णा काटे यांनी केले , कारवाई न झाल्यास 1 सप्टेंबर पासून महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवधर्म फाउंडेशन च्या वतीने देण्यात आलाय .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: