संभाजीराजे यांनी केला मराठा समजातील तरुणांना आवाहन

0 159

मुंबई- माझ्या निडर वाघांनो तुम्हीच जर असे हातबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का? या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. कोणीही असे पर्याय निवडू नयेत. अश्या शब्दात संभाजी राजे भोसले यांनी मराठा समाजाच्याबतरुणाला आत्महत्यांना करण्यासाठी विनंती केली. 

त्यांनी म्हटले आहे की जर तुम्ही आत्महत्या केली तर हे मला चांगले वाटणार नाही या लढाईमध्ये तुमच्या सर्वांची मला गरज आहे. ते  पुढे म्हटले की विवेक रहाडे या बीड मधील तरूणाने मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे आत्महत्या केली यामुळे मी खूप दुःखी झालो आहे . विवेक राहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली.

Related Posts
1 of 2,057

त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणं, ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. मराठा आरक्षणाची अटीतटीची लढाई आपण लढत आहोत. कोणत्याही परिस्थितीत हा लढा असाच चालू राहील. आणि मला विश्वास आहे की आपण नक्की जिंकू! हा लढा सुरू असताना, युवकांनी आत्महत्या करू नयेत. आत्महत्या हा पर्याय अजिबात नाही. तुम्ही आत्महत्या करू नाही ही लढाई आपण जिंकू असा सुद्धा ते या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: