DNA मराठी

संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाची शक्यता 

0 226

मुंबई -हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पावसाला स्थिती अनुकूल असून, येत्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर १९ सप्टेंबर पासून कोकण, मराठवाडय़ात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार,पावसाची शक्यता आहे.

राज्याच्या काही भागांमध्ये १८ सप्टेंबर पासून मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.पावसाच्या दीर्घकालीन पूर्वानुमानानुसार येत्या आठवडय़ात राज्यात सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतरच्या आठवडय़ात पावसाचे प्रमाण कमी असेल, मात्र अद्याप परतीच्या पावसाला सुरुवात झालेली नाही. गुरुवारी राज्यात काही ठिकाणी पाऊस झाला. गुरुवारी दिवसभरात मुंबई शहर आणि उपगनरात पाच मिमीपर्यंत,  ठाणे आणि परिसरात पाच ते दहा मिमी, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली परिसरात पाच मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली.

Related Posts
1 of 2,489

पाऊस सक्रिय असल्याने  ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. मागच्या २ दिवसा पासून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि गोव्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे काही ठिकाणी नद्यांना पूर सुध्दा आला आहे. १८ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर या आठवडय़ात विदर्भ वगळता राज्यात सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात पावसाची हजेरी लागू शकते. मात्र उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे, विदर्भात पावसाचे प्रमाण कमी असेल.

त्या नंतरच्या आठवडय़ात २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या काळात केवळ कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याजवळच्या जिल्ह्यंमध्ये पाऊस असेल.                                                                                        

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: