संपूर्ण देशात करोनाची लस मोफत मिळेल – डॉ. हर्षवर्धन

0 26

नवी दिल्ली– आजपासून देशातील प्रत्येक राज्यात कोरोनाच्या लसी करण्याच्या तयारीसाठी ड्राय रन सुरु करण्यात आले आहे. दिल्लीमध्ये एका रुग्णालयात जाऊन याचा आढावा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी घेतला त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत कोरोनाच्या लसीबद्दल एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की केवळ दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात करोनाची लस मोफत मिळेल अशी महत्वाची घोषणा त्यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले की देशातील सर्वच नागरिकांना करोनाची लस घेणे बंधनकारक नाही. देशातील सर्वच नागरिकांना करोनाची लस मिळणार नसल्याचे केंद्र सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

Related Posts
1 of 1,308

करोनाच्या प्रति हर्ड इम्युनिटी विकसित व्हावी आणि करोना संसर्गाची साखळी तुटावी यासाठी आवश्यक तेवढ्याच लोकांना करोनाची लस टोचली जाणार आहे. मात्र, ज्यांना करोनाची लस टोचणी जाईल त्यांना एकही पैसा द्यावा लागणार नाही.

कोणाला लस द्याची आहे याबाबत सरकार निर्णय घेणार आहे. अ पहिल्या टप्प्यात ५१ लाख लोकांना लस टोचली जाणार आहे. यात आरोग्य कर्मचारी, करोना योद्धे, ५० वर्षांहून अधिक वय असलेले नागरिक आणि इतर गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांचा समावेश असेल असा सुद्धा त्यांनी म्हटले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: