संत किसनगिरीनगर येथे दत्त जयंती उत्सव साधेपणाने

0 32

अहमदनगर –  नगर शहरातील उपनगरात सावेडी भागातील पाईपलाईन रोड भिस्तबाग येथील गुरुदत्त भक्तिधाम मध्ये दरवर्षी उत्साहात साजरा केला जाणारा भगवान दत्तात्रेय जन्मसोहळा यावर्षी   कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्येने आरोग्याचे नियम पाळून साजरा केला.  दर वर्षी श्री  भगवान दत्तात्रेय जन्मसोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. तथापि कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. निर्णयानुसार या वर्षी श्री दत्त जयंतीनिमित्त होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम हे श्रीं दत्तात्रेय च्या मंदिरामध्ये स्थानिक सेवेकरी उपस्थितीत पार पडला.

     हे पण पहा – अखेर हटवला देहविक्रीचा अड्डा

श्री दत्तात्रेय भगवान व श्री समर्थ सदगुरू किसनगिरीबाबांच्या  व प्राप्त :स्मरणीय प. पू. गुरुवर्य श्री. भास्करगिरी महाराज. श्री क्षेत्र देवगड संस्थान यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने साकारलेल्या गुरु दत्त भक्तिधाम संत किसनगिरीनगर येथील हे  कार्यक्रमाचे तिसरे वर्ष होते. दरवर्षी श्री दत्त जयंती महोत्सवाचे साजरा होत आहे. यावेळी  गुरु दत भक्तिधाम संत किसनगिरीनगर पाईपलाईन रोड भिस्तबाग अ. नगर येथे कायॅकमाचे आयोजित करण्यात आले होते.

 राज्यात नव्या कोरोना स्ट्रेनचा एकही रूग्ण नाही – राजेश टोपे 

Related Posts
1 of 1,301

श्री दत जयंतीनिमित्त सकाळी ५ ते ८ नित्यपुजा व आरती, सकाळी ९. ते १२ अभंगावली गंथाचे पारायण, दर पौर्णिमेची महाआरती दुपारी १२ वा. हरिपाठ दुपारी ३. ३० ते ४. ३० श्री दत्त अवतार महिमा अंभग वाचन व प्रवचन (श्री दुतारे महाराज) नंतर श्री दत्तात्रेय भगवान जन्म सोहळा. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर महाप्रसादचे आयोजित रद्द करण्यात आले होते.  सर्व श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा नगर भक्तमंडळ यावेळी उपस्थित होते.

बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे ? – उर्मिला मातोंडकर

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: