DNA मराठी

संजय राऊत यांच्या कंगना आणि भाजपवर हल्ला

0 82

मुंबई- माझा हा देश सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांना भाजपसमर्थक मोदीभक्त एका नटी ने आतंकवादी म्हणले. आंदोलन करणारे शेतकरी अतिरेकी असतील तर त्या समस्त अतिरेक्यांसाठी सरकारने नवे कृषिविधेयक मंजूर केले असे मानायचे काय? असा प्रश्न करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा अभिनेत्री कंगना राणावतवर टीका करत भाजपवर हल्ला केला आहे.

हे हल्ला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून शेती विधेयकावरून सुरू असलेल्या गोंधळा वरून करण्यात आले आहे.

कंगना राणावतने शेती विधेयकाविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना अतिरेकी असं म्हटलं होतं. तिच्या या वक्तव्यावरून सेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे.आपल्या हक्कांसाठी लढणारे शेतकरी आतंकवादी आहेत असा कांगावा कोणी करीत असेल तर ती बेइमानीच आहे. पण एका नटीच्या बोलण्यावर नागोबासारखे डुलणारे राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या अवमानावर गप्प बसले आहेत. पाशवी बहुमत, जोरजबरदस्तीच्या दंडेलीवर हे विधेयक मंजूर करून घेतले.

Related Posts
1 of 2,489

पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशात या विधेयकाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. ठिकठिकाणी त्यांनी चक्काजाम केला आहे. हे सर्व संयमाने आणि शांततेने सुरू असताना शेतकऱ्यांना दहशतवादी संबोधणे हे कसले लक्षण मानावे? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थितीत केला.


शेतकऱ्यांवर लाठीमार केला, गुन्हे दाखल केले हा तर अतिरेकच म्हणावा लागेल. बाबर सेनेनेसुद्धा इतका जुलूम केला नसता; पण हा देश सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांना भाजपसमर्थक मोदीभक्त नटी ने आतंकवादी ठरविले. आंदोलन करणारे शेतकरी अतिरेकी असतील तर त्या समस्त अतिरेक्यांसाठी सरकारने नवे कृषिविधेयक मंजूर केले असे मानायचे काय? असा थेट प्रश्न करत सेनेनं भाजपला ठोला लावला आहे.

नव्या विधेयकाच्या दोन बाजू आहेत. सरकारने एपीएमसीमधील दलालशाही खतम केली व या मार्केटच्या बाहेरही शेतकऱ्यांला आपला माल विकता येईल बाहेर माल विकला जाईल, तो विकत घेणारे नक्की कोण हाच वादाचा विषय आहे. बडे उद्योगपती आता किराणा भुसार व्यवसायात गुंतवणूक करीत आहेत. म्हणजे कॉर्पोरेट कंपन्यांच्या नव्या गुलामीत शेतकरी फसणार तर नाही ना? अशी शंका संजय राऊत यांनी उपस्थितीत केली.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: