संजय राऊत-फडणवीस भेटीवर शरद पवारांनी दिली आपली प्रतिक्रया

0 34

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत आणि विधासनभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपली  प्रतिक्रिया दिली आहे. पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी सांगितले  संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुलखातीचा राजकीय अर्थ काढण्याचं कारण नाही. संजय राऊत यांनी माझी मुलाखत घेतली होती.

त्यावेळीच त्यांनी इतर पक्षांच्या नेत्याच्या मुलाखती घेणार असं जाहीर केलं होतं. त्यामुळे त्यांच्या या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याचं कारण नाही. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा मध्यावधी निवडणुकीचा दावा फेटाळून लावला. राज्यात मध्यावधीची शक्यता नाही असं ते म्हणाले आहेत.

Related Posts
1 of 1,357

 काल चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असा दावा केला. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी असा दावा केला होता .     

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: