संगमनेरमध्ये रस्त्यावर आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, पोलिसांकडून दोन संशयित ताब्यात 

0 24

 अहमदनगर –  अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामधील आंबी फाटा येथे नाशिक-पुणे महामार्गालगत रस्त्यावर एक मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशियतांना ताब्यात घेतले आहे. त्यांची पोलीसकडून कसून चौकशी करण्यात येथ आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी कि  नाशिक-पुणे महामार्गालगत आंबीफाटा परिसरात खंदरमाळवाडीच्या हद्दीत एक अनोळखी ४५ ते ५० वर्षीय इसमाचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळून आला आहे अशी माहिती घारगाव पोलिसांना  मिळताच पोलीस निरीक्षक सुनिल पाटील, राजू खेडकर, सुरेश टकले, संतोष खैरे, किशोर लाड, हरिश्चंद्र बांडे, प्रमोद चव्हाण, गणेश तळपाडे, पोलीस पाटील बाळासाहेब कदम, कुंडलिक साळुंके  घटनास्थळी पोहचून मृत व्यक्तीचे ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे . आणि मृतदेह खाजगी रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रूग्णालयात पाठविण्यात आले . पोलिसांनी या प्रकरणी तपासाची च्रक फिरवत आता पर्यंत दोन संशयित तरुणांना ताब्यात घेतले आहे आणि त्यांची कसून चौकशी पोलीसकडून सुरु झाली आहे .

आशिष शेलार साहेब खरं सांगा दिप सिद्धू तुमचे कोण?? – अमोल मिटकरी

Related Posts
1 of 1,290

सदर मृतदेह हा अज्ञात व्यक्तीचा असून त्याच्या अंगात निळसर राखाडी रंगाची फूल पॅन्ट, शर्ट फिक्कट गुलाबी, प्लास्टिक काळी चप्पल असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत व्यक्तीच्या डोक्याला व छातीला मार असून प्राथमिक अंदाजानुसार खुनाचा प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे .

आपणच धुडगूस घालून आपल्या मालमत्तेची हानी करावी हे फारच दुर्दैवी आहे- अण्णा हजारे

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: