DNA मराठी

संकटाच्या सवतःला अंतर देऊन ;बैलपोळा उत्साहात साजरा

0 245
Related Posts
1 of 2,489

अहमदनगर : भारत हा कृषिप्रदान देश असून शेती आणि शेती म्हणाल तर बैल हर आलेच . वर्षभर आपल्यासाठी कष्ट करणाऱ्या ” सर्जाराजाचे ” आभार मानण्यासाठी  बळीराजा मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करतो . या दिवशी बैलाला कुठलाही काम न सांगता पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो त्याला सजवला जातं .  चातुर्मासातील पहिला महिना श्रावण. व्रत-वैकल्ये, सण-उत्सव यांची रेलचेल असणारा महिना, संपूर्ण श्रावण महिन्यात कोणती ना कोणती व्रत वैकल्ये असतातच. श्रावण महिन्याच्या सुरुवातीला देवघरासमोर चिकटवल्या जाणाऱ्या जिवतीचा कागदही अनेकार्थाने वैशिष्ट्यपूर्ण असाच असतो. श्रावणातील प्रत्येक व्रत-वैकल्ये, सण-उत्सव यांना धार्मिक महत्त्व आहे, तसे ते शास्त्रीय, व्यवहारिक, नैसर्गिक, कृषी यादृष्टिने ते महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्यांचा सखा, सोबती, प्रत्येक सुख दुःखात सहभागी असणारा, धन्यासाठी वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. श्रावण अमावास्येला पोळा साजरा करण्याची पद्धत महाराष्ट्रात असून सध्या कोरोनाचं  सावट  जरी असलं तरी आपली परंपरा न सोडता बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय . 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: