श्रीगोंदा दौंड रोडवर अपघातात 2 जण जागीच ठार

0 26

श्रीगोंदा  –  नगर  दौंड रोडवर काष्ठी नजीक दुचाकीला अज्ञात ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिल्याने अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे त्यामुळे नगर दौंड रोड सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.

श्रीगोंदा तालुक्यातून जाणाऱ्या नगर दौंड रोडवर हॉटेल शिवनेरी जवळ, काष्टी, अ.नगर ते दौंड जाणारे हायवेवर, काष्टी ता. श्रीगोंदा. या ठिकाणी अज्ञात ट्रक वरील चालक नाव पत्ता माहीती नाही.याने दुचाकी वरील अजय नानासाहेब वाळुंज, वय 22 वर्षे, रा. टाकळीकडेवळीत, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर व  प्रविण योगेश खरात, वय 13 वर्षे, रा. खरातवाडी, आनंदवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर यास समोरून जोरात धडक दिल्याने दोन जण गंभीर जखमी झाले होते काष्ठी गावातील जय भाऊ बोत्रे  प्रशांत भोर आणि सुरज भैय्या राहींज हे तिघेही पेशंटला घेऊन उपचारासाठी दौंडच्या दिशेने घेऊन जात असताना रस्त्यात त्यांनी प्राण सोडले त्यामुळे दोघेही जण जागीच ठार झाले आहेत याबाबतची माहिती श्रीगोंदा पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली .
Related Posts
1 of 1,290

राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनीटचे तातडीनं ऑडीट करा – अजित पवार 

स.पो.नि. व्ही.एम.पाटील यांनी घटनेचा पंचनामा करून मारुती भिमराव मखरे, वय 44 वर्षे, धंदा- शेती, रा. मखरेवाडी, श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात  गुन्हा रजी न 26/2021 भादंवि क. 304(अ),279,337,338,427  मो.वा.का.क. 184,134(अ)(ब),177 नुसार अज्ञात ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याच्या तपास  पो.हे.कॉ. एम.के. गावडे करत आहेत त्यामुळे नगर दौंड रोड सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: